अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून धर्मांधाने हत्या केल्याच्या प्रकरणी संतप्त महिलांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा !

आरोपी आसिफ मंसूरी

मुंब्रा, ९ एप्रिल (वार्ता.) – येथे १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या आसिफ मंसूरी याला अटक केली. संतप्त महिलांनी मोर्चा पोलीस ठाण्यावर नेला. आसिफ याच्यासह आणखी आरोपी असल्याचा आरोप महिलांनी केला असून आसिफ आणि त्याचे साथीदार नागरिकांना नेहमी त्रास देत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, असे आश्वासन मोर्चेकर्‍यांना दिले.