वारीला बंदी घालून शासनाने फार मोठा अपराध केला ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

संतवीर बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कराड (जिल्हा सातारा) येथे मोर्चा

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत स्थानिकांचा सिडकोच्या कार्यालयाला घेराव !

नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांनी २४ जून या दिवशी येथील सिडकोच्या कार्यालयाला घेराव घातला.

दुधाला आधारभूत किंमत देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन !

नगर जिल्ह्यात किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्‍यांनी गावातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.

दूध दरासाठी राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा दूध उत्पादकांचा निर्णय !

दळणवळण बंदीचा अपलाभ घेत खासगी आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलिटर अल्प केले, मात्र ग्राहकांना आहे त्याच दराने विक्री करत ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूटमार केली.

मराठा समाजाला न्याय दिल्याविना मी गप्प बसणार नाही ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, भाजप

आताच्या सरकारला मी हात जोडून विनंती केली; पण तरी काही झाले नाही. काय होईल, ते होईल. आम्ही ठरवले आहे की, आंदोलन निश्‍चित आहे.

करमाळा (जिल्हा सोलापूर) येथे तिरडी मोर्चा काढत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध

उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टी.एम्.सी. पाणी उचलण्याच्या निर्णया विरोधात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

पाकमध्ये हिंदु मुलींच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदु पत्रकाराची हत्या !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.

पी.एफ्.आय.कडून वर्ष १९२१ मध्ये मलाबार येथील हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?