पाकमधील प्रसिद्ध हिंगलाज मंदिरावर धर्मांधांचे २२ मासांमध्ये ११ वे आक्रमण !

  • ‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड उघडतील का ? – संपादक
  • ‘पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणावरून भारत सरकार तरी त्यांच्या रक्षणासाठी काही करील का ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात सातत्याने उपस्थित होत आहे ! – संपादक

थारपारकर (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील खत्री मोहल्ला येथील प्रसिद्ध हिंगलाज माता मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून तोडफोड केली. गेल्या २२ मासांत या मंदिरावरील हे ११ वे आक्रमण आहे. या घटनेनंतर हिंदूंनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)

या घटनेनंतर ‘पाकिस्तान हिंदू मंदिर व्यवस्थापन’चे अध्यक्ष कृशेन शर्मा घटनास्थळी पोचले. ते म्हणाले की, पाकमधील इस्लामी कट्टरतावाद्यांना पाक सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांची काहीच भीती वाटत नाही.