मराठी भाषिकांवरील राजद्रोहाचे खटले मागे घ्यावेत या मागणीसाठी २२ जानेवारीला आंदोलन ! – शिवसेना

मध्यभागी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे

कोल्हापूर – कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवरील राजद्रोहाचे खटले मागे घ्यावेत, या मागणीसाठी २२ जानेवारीला कोल्हापूर ते बेळगाव ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दिंडी मोर्चा’ काढण्यात येणार असून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, वैभव जाधव, अमित सोलापुरे यांसह अन्य उपस्थित होते.

विजय देवणे पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा अवमान झाल्यावर याचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन करणार्‍या ६१ मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने राजद्रोहाचे गुन्हे नोंद केले आहेत. तरी हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी आम्ही मागणी करतो. २२ जानेवारीला सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक करून या मोर्च्याला प्रारंभ होईल. मोर्चा आणि कारागृहमुक्ती आंदोलनासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाची रितसर अनुमती घेण्यात येणार आहे.’’