सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – शालेय पोषण आहार कर्मचार्यांच्या संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांच्या घोषणा देत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार कर्मचार्यांचे मानधन गत ४ महिन्यांपासून रोखून ठेवले आहे. हे मानधन तात्काळ देण्यात यावे. किमान वेतन २४ सहस्र रुपये मिळावे. वेतन लागू होईपर्यंत १० सहस्र रुपये मानधन मिळावे. कायम सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन मिळावे. शालेय पोषण आहार कर्मचार्यांना सरकारी कर्मचार्यांचा दर्जा मिळावा. नियम सोडून अन्यायाने अल्प केलेल्या शालेय पोषण आहार कर्मचार्यांना पुन्हा कामावर घ्यावे. तसेच त्यांना त्यांच्या फरकासहित मानधन देण्यात यावे.