संपादकीय : आंदोलने, मोर्चे आणि सर्वसामान्य !
वेळी प्रश्न, समस्या यांची उत्तरे मिळत नाहीत, तेव्हा मोर्चे काढले जातात आणि आंदोलने केली जातात. त्यामुळे हे प्रकार म्हणजे लोकशाहीचा जणू अविभाज्य भागच झाले आहेत. मुंबई म्हटली की, आंदोलने, मोर्चे आणि पदयात्रा हे समीकरण ओघाने येते;