पुणे येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

मनोज जरांगे पाटील

पुणे – परभणी येथील ‘मूक मोर्चा’मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते बाळासाहेब सानप, मंगेश ससाणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

परभणीतील मूक मोर्चामध्ये जरांगे पाटील यांनी ‘घरामध्ये घुसण्याची’ भाषा बोलली होती. आपल्या राज्यात कुणी जर अशा प्रकारचे विधान करत असेल आणि राज्यात हिंसाचार घडवू पहात असेल, तर अशा व्यक्तींवर बंधन आणले पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.