नवी देहली – मोहनदास गांधी यांचे छायाचित्र असलेले बिअरचे ‘कॅन’ (डबा) सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. या व्हिडिओनंतर भारतियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या आस्थापनाकडून या बिअरची निर्मिती करण्यात आली, तिने यापूर्वी मदर तेरेसा, नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या नावे बिअर बनवलेल्या आहेत.