Erdogan Urges India : (म्हणे) ‘आम्ही पूर्वीप्रमाणेच काश्मिरी बांधवांसमवेत एकजुटीने उभे आहोत !’ – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग !

डावीकडून रेसेप तय्यिप एर्दोगान आणि शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्‍यावर आहेत. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी २४ करारांसह एक सामंजस्य करार करण्यात आला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना एर्दोगान म्हणाले की, काश्मिरी लोकांच्या आकांक्षांचा योग्य विचार करून भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न सोडवला पाहिजे. आम्ही पूर्वीप्रमाणेच काश्मिरी बांधवांसमवेत एकजुटीने उभे आहोत.’

संपादकीय भूमिका

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घेऊन एर्दोगान यांनी यात नाक खुपसू नये ! पाकिस्तान बुडणारा देश आहे, त्याला साहाय्य करणारेही बुडून जातील, हे त्याने कायम लक्षात ठेवावे !