US President Donald Trump : भारताचा कुणीतरी भांडाफोड केल्यामुळे त्याने आयात शुल्क अल्प केले ! – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आमच्याकडून इतके आयात शुल्क वसूल करतो की, तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाहीत. आता भारताचा कुणीतरी भांडाफोड केल्यामुळे त्याने आयात शुल्क अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले. भारताने आयात शुल्क अल्प करण्याची सिद्धता दर्शवल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

व्हाईट हाऊसमधील (राष्ट्राध्यक्षांचे निवास आणि कार्यालय येथील) ओव्हल कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेला आर्थिक, वित्तीय आणि व्यापारी दृष्टीकोनातून जगातील अनेक देशांनी लुटले आहे. माझ्या पहिल्या कार्यकाळामध्ये मी यावर काही प्रमाणात निर्बंध आणले होते. आता माझ्या दुसर्‍या कार्यकाळात ही लूट थांबवण्याचा मी प्रयत्न करत आहे.