Biggest Land Mafia WAQF BOARD : वक्‍फ बोर्डाकडे ४५ देशांच्‍या क्षेत्रफळाहूनही अधिक भूमी !

नवी देहली : केंद्र सरकारने वक्‍फ बोर्ड कायद्यात संशोधन करण्‍याच्‍या संदर्भात संसदेत प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर झालेल्‍या चर्चेच्‍या वेळी वक्‍फ बोर्डाकडील संपत्ती जाणून देशातील जनतेला आश्‍चर्याचा धक्‍का बसला.

आधिकृत आकेडेवारीनुसार भारतातील वक्‍फ बोर्डाकडे जगातील ४५ देशांच्‍या क्षेत्रफळाहूनही अधिक भूमी असल्‍याचे समोर आले आहे. देशात वक्‍फ बोर्डाकडे ३ सहस्र ८०४ चौरस किलोमीटर एवढी भूमी आहे. ही जगातील ४५ देशांच्‍या क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. उदाहरणच द्यायचे झाल्‍यास समोआ देशाचे क्षेत्रफळ २ सहस्र ८०३ चौरस किलोमीटर, मॉरीशसचे क्षेत्रफळ २ सहस्र ७, हाँगकाँगचे क्षेत्रफळ १ सहस्र ११४, बहरीनचे  ७८७ आणि सिंगापूरचे ७३५ चौरस किलोमीटर एवढे आहे.

रेल्‍वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्च यांच्‍यानंतर वक्‍फ बोर्डाकडे सर्वाधिक संपत्ती !

देशातील सध्‍याच्‍या वक्‍फ बोर्ड कायद्यामधील वादग्रस्‍त तरतुदीनुसार एखादी भूमी वक्‍फ बोर्डाकडे गेली, तर ती पुन्‍हा फिरवली जाऊ शकत नाही. एका आकडेवारीनुसार देशात रेल्‍वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्च यांच्‍यानंतर, सर्वाधिक भूमी वक्‍फ बोर्डाकडेच आहे.

संपादकीय भूमिका

वक्‍फ बोर्ड म्‍हणजे भारतात लँड जिहाद राबवण्‍यासाठी मुसलमानांना मिळालेले सरकारमान्‍य साधन आहे. वक्‍फ कायदा रहित करणे का आवश्‍यक आहे, हे यातून दिसून येते !