हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षणाचे मोठे कार्य करत आहे ! – सैनिकांची प्रतिक्रिया

आम्ही देशाचे रक्षण करतो तुम्ही धर्माचे रक्षण करत आहात. धर्माचे रक्षण करणे, हे मोठे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सीआर्पीएफ्’च्या) सैनिकांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात प्रसारासाठी गेलेले सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी वसंतपंचमीच्या दिवशी अनुभवला श्री गुरुपरंपरेचा शुभाशीर्वाद !

वसंतपंचमीच्या दिवशी सकाळी श्रीक्षेत्र द्वारका येथील तपस्वी श्री गिरिजानंद गिरि हे सनातन संस्थेच्या तंबूत आले होते. येथे येणार्‍या अन्य तपस्वींपेक्षा ते वेगळे वाटले. त्यांच्याकडे पाहून साक्षात श्री अनंतानंद साईश (प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु) आल्याचा भास होत होता.

कुंभक्षेत्रातील जागृत तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पंडांकडून (पुजार्‍यांकडून) होणारी लूटमार !

अलाहाबाद किल्ल्यामध्ये हिंदूंचे पवित्र ‘अक्षयवट’ अतीप्राचीन वटवृक्ष आहे. अक्षयवटाचे दर्शन करण्यासाठी प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुंभमेळ्यामध्ये गंगानदीत पवित्र स्नान

येथे २४ फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगानदीत स्नान केले. तसेच नंतर येथे पूजाअर्चा केली. या वेळी त्यांच्यासमवेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

कुंभमेळ्यातील साधूंची दु:स्थिती आणि त्यांचे अयोग्य वर्तन !

धर्मकार्य करण्याऐवजी केवळ पैसा मिळवण्यासाठी कुंभमेळ्यात आलेले काही तथाकथित साधू-महाराज !

सनातन संस्था हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करत आहे ! – विशेष पोलीस अधीक्षक तथा ब्राह्मण एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जुगलकिशोर तिवारी

सनातन संस्था अन्य संघटनांना समवेत घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समर्पित भावाने कार्य करत आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस अधीक्षक तथा ब्राह्मण एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जुगलकिशोर तिवारी यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

साधूंची जवळून ओळख करून देणारा कुंभ !

साधूसंत ! सध्या हा अनेकांच्या टिंगलटवाळीचा आणि टीकेचा शब्द असला, तरी कोट्यवधी हिंदूंसाठी हा श्रद्धेचाही भाग आहे. माध्यमांच्या अपप्रचारामुळे असेल किंवा धर्मविषयक अज्ञानामुळे असेल, आज साधूसंतांपासून लांब रहाणारे बहुतांश जण आहेत; पण आज असेही अनेकजण आहेत, जे संतांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाला आकार देत आहेत.

धर्मांध जिहादींना सरकारने धडा शिकवावा ! –  ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके

देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी येथे व्यक्त केले.

सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ! – श्री महंत पद्मानंद सरस्वती,उत्तरप्रदेश

सनातन संस्थेने ‘मनुष्याने जीवन कसे जगावे’, ‘कसे कर्म करावे’, ‘जन्मदिवस साजरा करावा’, या संदर्भात चांगले प्रदर्शन लावले आहे. सनातन संस्था अशीच पुढे वाढत जावो, अशी मी गंगामाता आणि श्री हनुमान यांच्या चरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. 

कुंभमेळ्यात साधूसंतांना नि:शुल्क सुविधा पुरवू न शकणारे सध्याचे नतद्रष्ट प्रशासन !

‘जेव्हा मी दैनिक सनातन-प्रभातमध्ये ‘प्रयाग येथील कुंभमेळ्यात सरकारने कुंभनगरीत वास करणार्‍या साधूंना वीजपुरवठा न करता त्यांच्याकडून कर वसूल केला आणि काही सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत’, हे वृत्त वाचले, तेव्हा मी काही दिवसांपूर्वी ‘भक्तीवेदांत बुक ट्रस्ट’ यांच्या ‘श्रीकृष्ण : पूर्ण पुरुषोत्तम भगवान’ आणि श्री. शिवाजी सावंत यांनी लिहिलेले ‘युगंधर’ या श्रीकृष्णाच्या चरित्रातील वाचलेला एक प्रसंग मला आठवला.


Multi Language |Offline reading | PDF