पोलिसांकडून इन्स्टाग्राम खात्याच्या विरोधात गुन्हा नोंद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील महाकुंभाच्या वेळी त्रिवेणी संगमात स्नान करणार्या, तसेच कपडे पालटणार्या महिला भाविकांची गुप्तपणे छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. काढण्यात आलेली छायाचित्रे, तसेच व्हिडिओ यांची ऑनलाईन विक्री केली जात असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांनी उघड केली आहे. या संदर्भात पोलिसांनी इन्स्टाग्राम अॅपवरील एका खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या खात्यावर महिलांचे आंघोळ करतांनाचे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आढळले. पोलिसांनी कॅलिफोर्नियातील इन्स्टाग्रामच्या मुख्य कार्यालयाला ई-मेल पाठवून या खात्याची माहिती मागितली आहे.
या खात्यावर ४ जून २०२४ या दिवशी एका मुलीच्या छायाचित्राची पहिली पोस्ट करण्यात आलेली आहे. यानंतर ११ फेब्रुवारी २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ३३ व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. या सर्व व्हिडिओंमध्ये महिला संगमात आंघोळ करतांना किंवा कपडे पालटतांना दिसत आहेत. असे व्हिडिओ १ सहस्र ९०० ते ४ सहस्र रुपयांना विकले जात आहेत.
संपादकीय भूमिका
|