|

नवी देहली – भाजपच्या नेत्या नाझिया इलाही खान यांच्यावर मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले आहे. अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप नाझिया इलाही खान यांनी केला आहे. या संदर्भात ‘एक्स’वर त्यांनी व्हिडिओ पोस्ट करून याची माहिती दिली.
On the way to kumbh I have been targeted by peaceful community 🙏
Help me @myogioffice pic.twitter.com/ZP1cBKWBCZ— Nazia Elahi Khan (सनातनी) (@ElahiNazia1) February 24, 2025
नाझिया खान यांनी सांगितले, ‘मी, माझी मैत्रीण प्रिया चतुर्वेदी आणि आणखी एका १९ वर्षांच्या मुलीसमवेत महाकुंभ येथे जाऊन स्नान करण्यासाठी जात होतो. एटा (उत्तरप्रदेश) येथूनच काही मुसलमानांनी आमच्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडीला धडक दिली. प्रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला वाचवण्यासाठी प्रार्थना करा. माझा हातही दुखावला गेला आहे. खूप रक्तस्राव होत आहे. मी आधीपासूनच मुसलमानांचे लक्ष्य राहिले आहे.’ प्रिया चतुर्वेदी ‘स्पॉटलाईट विथ प्रिया’ नावाचे यू ट्यूब चॅनल चालवते.
संपादकीय भूमिका
|