केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ मे या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २ मे या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या कोल्हापूर दौर्‍यावर आहेत.

भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात झाला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा !

वर्ष १८२४ पासून हा रथोत्सव चालू आहे. हा रथोत्सव भक्ती आणि शक्तीचा उत्सव मानला जातो. चैत्र पौर्णिमेला जोतिबा येथील यात्रा झाल्यावर प्रत्येक वर्षी हा रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास प्रारंभ  !

कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास १४ एप्रिलला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे अशास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे निश्‍चित !

केंद्रीय पुरातत्व विभाग १४ आणि १५ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करणार आहे. या कालावधीत भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता येणार नाही.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तींची वारंवार रासायनिक संवर्धन करूनही पुन्हा एकदा झीज !

पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर्.एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी केलेला अहवाल ४ एप्रिल २०२४ या दिवशी न्यायालयात सादर झाला.

भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने : काम लवकर पूर्ण करण्याची भाविकांची मागणी !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या भुयारी गटारीची वाहिनी दुरुस्ती करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम सध्या चालू आहे.

भारतीय स्टेट बँकेकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला ‘एल्.ई.डी. वॉल’ प्रदान !

भारतीय स्टेट बँकेकडून १५ मार्चला श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला एक भव्य अद्ययावत ‘एल्.ई.डी. वॉल’(भक्तांना दर्शन होण्यासाठी लावण्यात आलेला डीजिटल फलक) प्रदान करण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि अन्य कामे यांसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्ययासाठी राज्यशासनाची मान्यता !

यात मनकर्णिका कुंड कामासाठी ५ कोटी ४० लाख ९९ सहस्र ९३४ रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ८५ लाख ९२ सहस्र ८७ रुपये, तर नगारखाना इमारत दुरुस्तीसाठी ३ कोटी ४१ लाख ३४ सहस्र ७७३ रुपये व्यय केले जाणार आहेत.