कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास प्रारंभ  !

पितळी उंबर्‍याच्या आत भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आलेली उत्सवमूर्ती

कोल्हापूर – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास १४ एप्रिलला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. मूर्तीचे संवर्धन करण्यात येत असल्याने भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक भाविकांनी पितळी उंबर्‍याच्या बाहेरून कलश आणि उत्सवमूर्ती यांचे दर्शन घेतले.