नरकचतुर्दशीला श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्यास प्रारंभ !
मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबर्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला जातो. सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा होतो. त्यानंतर देवीची पहाटे काकड आरती होते.