|
पाटलीपुत्र (बिहार) – आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाची सत्ता आल्यास एका तासात दारूबंदी उठवीन, अशी जनताद्रोही घोषणा राजकीय रणनीतीकार तथा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी संवाद साधतांना केली. दारूबंदीमुळे बिहार राज्याची २० सहस्र कोटी रुपयांची हानी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या २ ऑक्टोबरला प्रशांत किशोर त्यांच्या जनसुराज्य पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत, तसेच ‘आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही बिहारमधील पूर्ण २४३ जागा लढवणार आहोत’, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘नितीश कुमार यांनी घोषित केलेली दारूबंदी केवळ दिखावा आहे. या दारूबंदीमुळे अवैध दारुविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा काही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी लाभ करून घेत असून सरकारची हानी होत आहे. बिहारच्या आजच्या परिस्थितीला जेवढे नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव उत्तरदायी आहेत, तेवढेच काँग्रेस आणि भाजप हेसुद्धा उत्तरदायी आहेत.’’
संपादकीय भूमिका
|