
नागपूर – हुडकेश्वर येथे दहावीत शिकणार्या मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून अल्पवयीन मुलगा आणि त्याची आई यांना कह्यात घेतले आहे.
वडिलांचे दारूचे व्यसन वाढल्याने घरातील वस्तू विकून ते दारू पित होते आणि पत्नी-मुलाला मारहाण करत असल्याने दोघे जण त्यांच्या जाचाला कंटाळले होते. १९ जानेवारीला वडिलांनी आईला पोटात मारहाण केल्याने आई विव्हळत असल्याचे मुलाला न पहावल्याने त्याने टॉवेलने वडिलांचा गळा आवळला. वडील गेल्यावर त्याने मित्राला ही घटना सांगितल्यावर मित्राने पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितल्यावर दोघे स्वतःहून पोलीस ठाण्यात आले.