तालुका मुरबाड (जिल्हा ठाणे) येथील आदिवासी मुलांना फराळ आणि फटाके यांचे वाटप !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम !

फतेहाबाद (हरियाणा) येथील ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ यांच्या रामलीलेच्या कार्यक्रमांत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !

हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’ला जागृत होऊन विरोध करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा.

अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांचे संपर्क अभियान !

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? याचाच अर्थ प्रशासनाला अवैध बांधकामावर कारवाई करण्याची इच्छा नाही. अशा भ्रष्ट आणि कामचुकार प्रशासनावरच प्रथम कारवाई करायला हवी !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित प्रयत्नांमुळे कसायाच्या तावडीतून गोमातेची सुटका !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्‍या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत मिळवली !

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करणारे ३० हिंदू पोलिसांच्या कह्यात !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंदूंना विरोध का करावा लागत आहे ?

‘क्लीन चीट’ मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात मुनव्वरचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही ! – सिद्धांत मोहिते, संस्थापक अध्यक्ष, सॅफ्रॉॅन थिंक टँक

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम रहित होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणार्‍या ‘सॅफ्रॉॅन थिंक टँक’चा आदर्श समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घ्यावा !