पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी २२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले.