विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम !

ठाणे, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी करता यावी; म्हणून विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कळवा-मुंब्रा विभागाच्या वतीने, तसेच ‘सेलिब्रेशन ग्रुप डायघर’ यांच्या वतीने फराळ आणि फटाके यांचे वाटप करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील गेटाची वाडी या भागातील आदिवासी मुलांना सर्व साहित्य वितरित केले. कळवा-मुंब्रा जिल्ह्याचे बजरंग दल संयोजक श्री. मोतीराम गोंधळी, बजरंग दल सहसंयोजक रवींद्र पाटील, डायघर-शीळ विभागाचे संयोजक प्रवीण पावशे, तसेच अरुण शर्मा, दिनेश भोईर आदी पदाधिकारी आणि ‘सेलिब्रेशन ग्रुप’चे सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती