तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदूंचे सैनिकीकरण व्हायला हवे ! – सुनील देवधर, रा.स्व. संघाचे पूर्वप्रचारक

देशांतर्गत कारवाया करून हिंदूंनाच नामोहरम करणार्‍या कट्टरपंथीयांचा जर सामना करायचा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच सामाजिक माध्यमांचा सदुपयोग करून प्रत्येकाने देशात जागृती करणे आवश्यक आहे.

राष्ट्रासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रेरणा प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून घ्यावी ! – प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, पिठाधीश्वर, तपोभूमी, कुंडई

राजकीय मान्यता झुगारून देण्याचे बळ कार्यकर्त्यांनी दिले; म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. हा माझा सत्कार नसून समाजाच्या ताकदीचा सत्कार आहे !

गोमंतकातील हिंदुत्वाची धगधगती ज्वाळा प्रा. सुभाष वेलिंगकर !

प्रखर राष्ट्राभिमान, हिंदु धर्मावरील नितांत प्रेम अन् तत्त्वनिष्ठा यांचे गोमंतकातील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर ! संघटनांमध्ये उत्तुंग कार्य करूनही गोमंतकातील सर्व हिंदु संघटना, मंदिरे आणि मठ-आश्रम यांना त्यांचा आधार वाटतो. हेच प्रा. वेलिंगकर यांचे व्यापकत्व !

शंकराचार्यांचा देहत्याग !

आदी शंकराचार्यांनी दीड सहस्र वर्षांपूर्वी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंना ज्ञान मिळण्यासाठी भारताच्या चारही दिशांना धर्मपीठांची स्थापना केली अन् तेथे शंकराचार्यांची नियुक्ती केली. ही परंपरा आजही चालू आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे याच परंपरेतील शंकराचार्य होते.

मंगळुरू येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने लावलेल्या फलकांवर पं. नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छायाचित्रे

फलकावर ‘राजकारणाचा आधार हिंदुत्व असावा, सर्व हिंदूंना सैनिक करा’ असे लिखाण

जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना आणि धर्मपालन करणार्‍या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्‍या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे.

जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

(म्हणे) ‘तुला अधिक दिवस जगू देणार नाही !’

‘जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे’, या परिस्थितीलाही आता नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवायचे का ? बहुसंख्य हिंदूंच्याच देशात त्यांच्या हितांसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याच्या धमक्या मिळणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

हिंदु मक्कल कच्छीच्या (हिंदु जनता पक्षाच्या) कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथप्रदर्शनाला उपस्थितांपैकी अनेक जणांनी भेट देऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच काही जणांनी ग्रंथ विकतही घेतले. कार्यक्रमस्थळी फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ. मुखर्जींच्या बलीदानामुळे काश्मीर आज भारतात ! – प्रकाश बिरजे, भाजप

आपल्या देशाच्या एका राज्यात भारतियांना प्रवेश करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेच्या कालावधीत डॉ. मुखर्जींचे निधन झाले. शामाप्रसादांच्या बलीदानामुळे काश्मीर भारतात राहिले.