अजूनही हिंदू एक होत नाहीत ! – शरद पोंक्षे यांची खंत

‘द केरल स्टोरी’मुळे बरेच हिंदू जागरूक झाल्याचे प्रतिपादन

शरद पोंक्षे यांची खंत

मुंबई – मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘काळे पाणी’ ही कादंबरी वाचत आहे. आज ‘द केरल स्टोरी’मुळे बरेच हिंदू जागरूक झाले आहेत. सावरकर गेली सव्वाशे वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडत आहेत. वर्ष १९६६ मध्ये ते गेले; पण आमच्यासारख्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून आम्ही सावरकर मांडण्याचा प्रयत्न करतो.

सावरकरांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांच्यासाठी वेचले, तरीही हिंदू अजून एक होत नाहीत. जागे होत नाहीत, यासारखे दुःख नाही. ऐकूया सावरकर, वाचूया सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊया. हिंदु धर्मातील सर्व जाती संपवून ‘हिंदु’ ही एकमेव जात निर्माण करूया. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करूया, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ शरद पोंक्षे यांनी सामाजिक संकेतस्थळावर एका व्हिडिओच्या माध्यमातून केले.