राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी आणि रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

चंडीगड – मला वाटते राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. काँग्रेसच्या पूर्वजांनीही संघाविषयी बरेच काही म्हटले होते. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी राहुल गांधी यांनी लंडनमधील कार्यक्रमात भारताची अपकीर्ती करणार्‍या विधानावर केले. हरियाणामध्ये आयोजित रा.स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सरकार्यवाह होसबाळे पुढे म्हणाले की,

देशाची विचारसरणी पालटण्याची आवश्यकता आहे. भारतातील हिंदुत्वाच्या विचारांना काही जण विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशा वेळी त्यांना खरा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे. काही जण देश तोडणारे आहेत. ते विश्‍वविद्यालयांतून घोषणाही देत असतात. सरकारने यावर कायदेशीर कारवाई करावी. देश तोडणार्‍यांपासून सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.