मुसलमान दिवसातून ५ वेळा नमाजपठण करतात. त्याप्रमाणे हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वेळ द्यावा. वीर सावरकर यांच्या विचारांनी जागरूक होऊन ‘हिंदु राष्ट्रासाठी मी काय करू शकतो’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी वेळ द्यावा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायचे असेल, तर प्रथम आपण हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घ्यायला हवी. हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर आपणाला वीर सावरकर यांच्या विचारांनी कार्य करायला हवे.
महंमद बीन कासीम याने भारतावर आक्रमण करतांना हिंदूंमध्ये फूट पाडून दाहिर राजाचा पराभव केला. प्रांत, भाषा, पंथ यांतील भेदामुळे हिंदूंचा पराभव होतो, हा आजवरचा इतिहास आहे. शिखांचे धर्मगुरु गुरुगोविंदसिंह यांनी स्वत:चा पंथ ‘खालसा’ असल्याचे म्हटले; परंतु धर्म ‘हिंदु’ असल्याचे सांगितले. सनातन हिंदु धर्म हाच आपला धर्म आहे. ‘हिंदुत्व हेच आपले राष्ट्रीयत्व आहे’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपण समजून घ्यायला हवेत. देशात हिंदू ८० टक्के आहेत; परंतु आपण जातीपातींमध्ये विभागले आहोत. मुसलमान आपल्यावर अत्याचार करतात’, याचे कारण हिंदू एकत्र नाहीत. हा दोष हिंदूंचा आहे. आताची लढाई तलवारीच्या जोरावर नाही, तर आर्थिक लढाई चालू आहे. ‘हलाल जिहाद’ ही मुसलमानांची आर्थिक लढाई आहे. हिंदुत्व ही केवळ उपासनापद्धत नाही, तर हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.