मैसुरू (कर्नाटक) – स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते. आपण मनाप्रमाणे काही लिहू शकत नव्हतो. लिहिल्यास कारागृहात जावे लागायचे. असेच आजदेखील घडत आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यास आधी अनुमती देण्यात आली होती; परंतु नंतर कार्यक्रमाच्या दिवशी अधिकार्यांच्या माध्यमातून अडचणी निर्माण करण्यात आल्या. राज्यातील काँग्रेस सरकार, म्हणजे हुकूमशाही वृत्तीचे हिटलर सरकार आहे, अशी टीका बेंगळुरू येथील युवा ब्रिगेड संघटनेचे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांनी केले. सावरकर प्रतिष्ठानाच्या वतीने ‘वीर सावरकर प्रशस्तीपत्र’ प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच मैसुरू मुक्त विश्वविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सुलीबेले बोलत होते. हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून सुलीबेले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
MB Patil Warns Chakravarti Sulibele For Telling Congress Is Hitler Government | ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿಟ್ಲರ್ ಸರ್ಕಾರ ಎಂದ ಸೂಲಿಬೆಲೆಗೆ ಖಡಕ್ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್#mbpatil #chakravarthisulibele #vijayapura #congress #bjp #congressgovernment #vijayavani https://t.co/jjgNtVX1Fo
— Vijayavani (@VVani4U) June 4, 2023
सुलीबेले यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसचे मंत्री एम्.बी. पाटील म्हणाले की, सुलिबेले यांनी ४ वर्षे काय केले ?, हे सर्वांना ठाऊक आहे. पाठ्यपुस्तकात सुधारणा करण्याच्या नावाखाली वाद निर्माण केला. हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र), अजान (नमाजपठणाच्या वेळेची आठवण करून देणे) आदींवरून अशांतता निर्माण केली. आमच्या शासनात असे प्रयत्न केल्यास निश्चितच कारागृहात डांबण्यात येईल.