Bulldozer Action Mhow (MP) : प्रशासनाने मशिदीजवळील १०० हून अधिक अतिक्रमणे बुलडोझरद्वारे पाडली !

महू (मध्यप्रदेश) येथे भारताचा विजय साजरा करणार्‍यांवर मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीचे प्रकरण

महू प्रशासनाची कारवाई

महू (मध्यप्रदेश) : येथे चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धा भारताने जिंकल्यावर काढण्यात आलेल्या दुचाकी मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात मशिदीतून धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने या मशिदीजवळील  १०० अतिक्रमणे हटवली आहेत. २० मार्च या दिवशी ही कारवाई करण्यात आली. चिकन मार्केट, पट्टी बाजार आणि गफ्फार हॉटेलसह अनेक भागांतील अतिक्रमणे पाडली आहेत. या काळात किरकोळ संघर्षही घडले. अतिक्रमण हटवण्यासाठी ७ दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती; मात्र त्यांनी स्वतःहून ती न हटवल्याने कारवाई करण्यात आली.


हे ही वाचा → Mhow (MP) Violence : ‘तुमचा राम तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ?’ – मुसलमानांचा हिंदूंना खोचक प्रश्न

संपादकीय भूमिका

प्रशासनाने हिंदूंवर आक्रमण होण्याची वाट न पहाता जेथे जेथे अतिक्रमणे आहेत, त्यांवर युद्धपातळीवर कारवाई केली पाहिजे ! या कारवाईच्या वेळीच अतिक्रमणकर्त्यांना सक्त ताकीदही दिली पाहिजे की, कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे तुम्हाला स्वप्नही पडता कामा नये ! अशी धमक दाखवल्यासच हे लोक सुतासारखे सरळ होतील !