|

मालवण – ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात उत्साह निर्माण झाला. मालवण शहरात याचा आनंद साजरा केला जात असतांना शहरातील आडवण, वायरी परिसरात असलेल्या परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकांनी भारताच्या विरोधात घोषणा दिल्या. ही घटना समजताच काही हिंदूंनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता भंगार व्यावसायिकांकडून अरेरावी करण्यात आली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिहादी प्रवृत्तीच्या या व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई करून ती भुईसपाट केली. (प्रशासन अशा घटना घडण्याची वाट पहात असते का ? आमदार राणे यांनी सूचना केली नसती, तर प्रशासनाची काय भूमिका राहीली असती ?, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. खरे तर प्रशासनाने नेहमीच सतर्क राहून अवैध बांधकामांच्या विरोधात कारवाई करणे जनतेला अपेक्षित आहे ! – संपादक)
Bulldozer action on anti-national Muslims’ illegal construction in Malvan (Sindhudurg district)
After India’s victory in the India-Pakistan cricket match, Muslims raised anti-national slogans
Angered Hindus confronted them and handed them over to the police
MLA @meNeeleshNRane… pic.twitter.com/ZADtgG68IK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 25, 2025
१. मुसलमानांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन अन्य मुसलमानांना भडकवण्याचा प्रयत्न केला. या वेळी मालवणातील हिंदु युवकांनी तेथे जाऊन देशद्रोह्यांना खडसावले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे.
२. या घटनेनंतर मालवणमधील सकल हिंदु समाज आक्रमक झाला आहे. मागील २ महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणात काही देशद्रोही मुसलमानांकडून झालेल्या देशद्रोही कारवायांची चौकशी करणे, तसेच भंगारवाले, भाजीवाले, बाहेरून आलेले मुसलमान व्यावसायिक यांची चौकशी करावी, यांचे आधारकार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची खात्री करावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.
३. या मागणीसाठी सोमवार, २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता शहरातील देऊळवाडा येथून मालवण पोलीस ठाण्यापर्यंत दुचाकी फेरी काढून पोलीस अधिकर्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये १०० दुचाकींसह १५० हिंदू सहभागी झाले होते. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, उमेश मांजरेकर यांच्यासह शकडो नागरिक उपस्थित होते.

देशद्रोही भूमिका खपवून घेणार नाही ! – दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख, शिवसेना
जर कुणी देशद्रोही भूमिका घेत असेल, तर ती खपवून घेणार नाही. आमदार नीलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक भूमिका घेऊ. अशी सर्व अनधिकृत बांधकामे हटवा, ही आमची भूमिका आहे. देशविरोधी भूमिका घेणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मालवणमध्येच नव्हे, तर जिल्ह्यात देशद्रोही मुसलमानांना थारा देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या वेळी दिली.
राष्ट्रविरोधी मुसलमानांचा स्थानिक मुसलमानांकडून निषेध !
मालवण – या घटनेनंतर शहरातील ‘सुन्नत जामतूल मुस्लिमीन मालवण’ या संघटनेच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. ‘भारत-पाकिस्तान’ यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर परप्रांतीय मुसलमानांकडून भारताच्या विरोधात घोषणा देण्याचा प्रकार घडला. या कृत्याचा स्थानिक मुसलमान समाजाकडून निषेध करण्यात आला आहे’, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी हसरत खान, जब्बीर खान, सलीम खान यांच्यासह अन्य मुसलमान उपस्थित होते. (नुसता निषेध नको, तर या राष्ट्रविरोधी मुसलमानांना हाकलून लावण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासाठीही स्थानिक मुसलमान प्रयत्न करणार का, हेही त्यांनी सांगावे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतातील केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर सिंधुदुर्गसारख्या शांतताप्रिय जिल्ह्यातही देशद्रोही आणि जिहादी मानसिकतेच्या मुसलमांनाचा शिरकाव झाला आहे, हे लक्षात हे संकट आता दाराशी आले आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सज्ज आणि संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे ! |