Mohammed Shami Slammed : रमझानमध्ये भारतीय क्रिकेटपटू महंमद शमी सरबत पित असल्यावरून मौलानांची टीका

डावीकडून गोलंदाज महंमद शमी आणि मौलाना शहाबुद्दीन रझवी

बरेली (उत्तरप्रदेश) – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज महंमद शमी सध्या चालू असलेल्या ‘चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धे’तील एका सामन्यात सरबत पितांना दिसला. सध्या रमझान चालू असल्याने त्याच्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘रमझानमध्ये उपवास न ठेवणे पाप आहे. तो शरियाच्या दृष्टीने गुन्हेगार आहे. त्याला देवासमोर उत्तर द्यावे लागेल.’ यावर ‘ऑल  इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, उपवास ठेवणे किंवा न ठेवणे, ही वैयक्तिक गोष्ट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की, जर महंमद शमी याला वाटत असेल की, देशाचे प्रतिनिधित्व करतांना उपवासामुळे त्याच्या कामगिरीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होईल किंवा त्याला काहीतरी होईल, तर तो कधीही झोपू शकणार नाही. तो एक कट्टर भारतीय आहे, ज्याने संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे. खेळात धर्म आणू नये. आज जर तुम्ही कोणत्याही मुसलमानाला विचारले तर तो म्हणेल की, त्याला महंमद शमी याचा अभिमान आहे.

संपादकीय भूमिका

  • कुणी कधी काय खावे आणि प्यावे ?, हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, हे यांना कोण सांगणार ?
  • एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे आता गप्प का ?