Kite Ban In Pakistan : लाहोर (पाकिस्तान) येथे इस्लामविरोधी असल्याने पतंग उडवण्यावर बंदी

मकरसंक्रांत आणि वसंत ऋतू या कालावधीत हिंदूंना पंतग उडवतांना येणार नाही !

लाहोर (पाकिस्तान) – आता पाकिस्तानमध्ये पतंग उडवणेही इस्लामीविरोधी कृती बनली आहे. उलेमांनी (इस्लाम धर्माविषयीचे ज्ञानी) लाहोर पोलीस विभागाशी चर्चा करून यासंदर्भात एक फतवा काढला आहे. या फतव्यात ३ कृती इस्लामीविरोधी घोषित करण्यात आल्या आहेत आणि त्या करणार्‍यांना गुन्हेगार ठरवण्यात आले आहे. यात एक चाकी सायकल चालवणे, पतंग उडवणे आणि हवेत गोळीबार करणे, या कृतींचा समावेश आहे. हे गुन्हे हराम (इस्लामविरोधी) आहेत हे सिद्ध करण्यासाठी फतव्यात कुराणातील आयती (पंक्ती) आणि हदीस (एका विशिष्ट परिस्थितीमध्ये महंमद पैगंबर कसे वागले, कसे बोलले याचा संग्रह) यांचा उल्लेख केला आहे.

१. पोलीस अधिकार्‍याने फतव्याचा हवाला देत सांगितले की, ही कृत्ये आत्महत्येसारखी आहेत; कारण कुराण स्पष्टपणे अशा कृतींना मनाई करते, ज्यामुळे आत्म-नाश होतो. या तिन्ही उपक्रमांवर त्यांच्या अनाठायी खर्चामुळे, घातक परिणामांमुळे आणि इस्लामीविरोधी यांमुळे बंदी घालण्यात आली आहे.

२. पोलीस महानिरीक्षक फैसल कामरान यांनी सांगितले की, गेल्या २० दिवसांत पोलिसांनी पतंग उडवणार्‍यांविरुद्ध १५० गुन्हे नोंदवले आहेत. मकरसंक्रांत आणि वसंत ऋतू यांनिमित्ताने परिसरात मोठ्या संख्येने हिंदू पतंग उडवतात, अशा वेळी हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच रस्त्यावर एक चाकी वाहन चालवल्याबद्दल १५१ जणांना अटक करण्यात आली आहे आणि हवाई गोळीबारात सहभागी असलेल्या ११८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

भारतातून अशा गोष्टींना प्रत्युत्तर देणे आता आवश्यक झाले आहे !