कबुतरांच्या विष्ठेतून रोगांचा प्रसार : दाणे घालणार्‍यांकडून दंडाची वसुली !

के.ई.एम्. रुग्णालयातील श्‍वसनविकार चिकित्सा आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कबुतरांची विष्ठा आणि पंख यांमध्ये ‘फंगल स्पोअर्स’ (बुरशी उत्पन्न करणार्‍या पेशी) आढळून आले आहेत. यामुळे माणसांना ‘एक्सट्रेंसिक अ‍ॅलर्जिक अ‍ॅलव्होलिटीस’ हा विकार होऊ शकतो.

बारामती (पुणे) येथील मुरुम उत्खननाच्या प्रकरणी ठेकेदाराला ४ कोटी रुपयांचा दंड !

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदार ‘शेळके कन्स्ट्रक्शन प्रा.लि.’ यांना बारामतीच्या तहसिलदारांनी ४ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी पाठपुरावा केला होता.

राजस्थानमधील भाजपच्या माजी आमदाराला २० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणी १० वर्षांचा कारावास

एका गुन्ह्यावर निकाल देण्यास २० वर्षे लागत असतील, तर तो न्याय म्हणायचा का ?

मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील अधिकार्‍याला फसवणुकीच्या प्रकरणी सुनावला ३ वर्षांचा सश्रम कारावास !

मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील एका अधिकार्‍याला पदाचा दुरुपयोग करून एका व्यक्तीची ४० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ३ वर्षांच्या सश्रम कारावासीची शिक्षा सुनावली आहे.

बसवाहकाने एक रुपया परत दिला नाही; म्हणून प्रवाशाला ३ सहस्र रुपये हानीभरपाई !

बेंगळुरू येथे बसवाहकाने प्रवाशाला तिकिटाचा एक रुपया परत न दिल्याने प्रवाशाने ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली. याच्या परिणामस्वरूप न्यायालयाने ग्राहकाला ३ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी पशूहत्या होऊ नये, याकरता ठळक सूचना फलक लावा ! – पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालय यांचे पत्र

विशाळगडावर सर्रास पशूहत्या केली जाते आणि हे गेली अनेक वर्षे गडप्रेमी शासनास निवेदन, आंदोलन यांद्वारे सांगत आहेत. त्या संदर्भात कारवाईचे अधिकार असतांनाही आजपर्यंत विशाळगडावर चालू असलेल्या पशूहत्येच्या संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही ?

नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल !

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही उपराजधानीसारखी शहरे अस्‍वच्‍छ असणे हा जनतेला प्रशासनाने शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

तुर्भे येथे बंदी असलेल्या थर्मोकोलची साठवणूक करणार्‍यावर कारवाई, ५ टेम्पो थर्मोकोल जप्त

या कारवाईत संबंधित दुकानदाराला १० सहस्र रुपये दंड आकारण्यात आला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांना तुर्भे येथे लक्ष्मी इंटरप्राईजेस या दुकानात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे वर्ष २००९ मध्ये धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे प्रकरण

उरलेल्या ७ आरोपींनाही शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित !

नागपूर येथील मोकळ्या जागेवरील कचरा उचलण्याचा व्यय मालकांकडून वसूल करणार

भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणार्‍यांना, तसेच घाण करणार्‍या पाळीव कुत्र्यांच्या मालकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा व्यय संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे.