केरळ येथील घटना !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील जलद गती न्यायालयाने प्रियकराला स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू दिल्याच्या प्रकरणी एका महिलेला ४० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह २० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१९ या काळात या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या महिलेचा पती मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता. त्यामुळे ही महिला तिच्या पतीसह रहात नव्हती. त्यानंतर या महिलेचे संबंध शिशुपालन नावाच्या व्यक्तीशी आले. यानेच या महिलेच्या मुलीवर बलात्कार केला.
१. न्यायाधीश आर्. रेखा निकाल देतांना म्हणाल्या की, या प्रकरणात शिक्षा आईलाच सुनावण्यात आली आहे; कारण खटला चालू असतांना मुख्य आरोपीने म्हणजेच या महिलेच्या प्रियकराने आत्महत्या केली. पीडित मुलीचे लहानपण तिच्या आईमुळे कुस्करले गेले. स्वतःच्या लहान मुलीचे रक्षण करण्याचे दायित्व तिच्या आईचे होते; मात्र या आईने प्रियकराला स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्काराची संमती दिली.
२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडितेच्या ११ वर्षांच्या सावत्र बहिणीचेही शोषण झाले आहे. पीडितेला आणि तिच्या ११ वर्षांच्या बहिणीला शांत रहाण्यासाठी धमकवण्यात आले होते. या दोन्ही मुली आजीच्या घरी पळून आल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले