गोवा : पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांना न्यायालयाकडून १० सहस्र रुपयांचा दंड

अशा अन्यायकारक वर्तणुकीसाठी कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील. पोलीस अधीक्षक पदावरील व्यक्ती जर तक्रारदाराला अशी वागणूक देत असेल, तर त्याखालील अधिकारी आणखी कसला आदर्श घेणार ?

पुनःपुन्हा न्यायालयात याचिका करणार्‍याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारत १० सहस्र रुपयांचा ठोठावला दंड !

सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीला निकाली काढण्यात आलेल्या  विषयांवर परत परत याचिका प्रविष्ट केल्यामुळे फटकारले. तसेच तिला १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. ‘अशा प्रकारच्या याचिका प्रविष्ट करणे वेळेचा अपव्यय करण्यासारखे आहे’, असे न्यायालयाने म्हटले.

‘अ‍ॅपल’ आस्थापनाला भारतियाने १३८ कोटी रुपयांना फसवले !

अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !

मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई !

कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या महापालिकेच्या वाय.सी.एम्. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.

बालविवाहाला उपस्‍थित राहिल्‍यास २ वर्षांच्‍या कारागृहासह १ लाख रुपयांचा दंड ! – जिल्‍हाधिकारी, अमरावती

मागील ३ मासांत अमरावती जिल्‍ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्‍या जिल्‍हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ११ बालविवाह थांबवण्‍यात आले आहेत. यंत्रणा दक्ष नसती, तर कदाचित् हे विवाह झाले असते.

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

रस्‍ता खोदतांना जलवाहिनी फोडणार्‍या ठेकेदाराला ८ लाख रुपयांचा दंड !

जलवाहिनी फुटल्‍याने स्‍थानिक भागातील पाणीपुरवठा २ दिवस खंडित झाल्‍याने रहिवाशांचे पुष्‍कळ हाल झाले. नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. नागरिकांच्‍या या रोषाला सामोरे जात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला होता.

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र दंड वसूल

एन्.एम्.एम्.टी.तून विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून ६ लाख ८० सहस्र ९८४ रुपये दंड वसूल करण्‍यात आल्‍याची माहिती एन्.एम्.एम्.टी.चे व्‍यवस्‍थापक तथा उपायुक्‍त योगेश कडूसकर यांनी दिली.

काँग्रेसच्‍या आमदाराला ९९ रुपयांचा दंड !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फाडल्‍याच्‍या प्रकरणी येथील न्‍यायालयाने काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला. पटेल यांनी दंड भरला नाही, तर त्‍यांना ७ दिवसांचा कारावास भोगावा लागू शकतो.