(म्हणे) ‘भारत आणि चीन एकाच कुटुंबातील दोन भावांप्रमाणे असल्याने मतभेद स्वाभाविक !’ – चीनचे भारतातील राजदूत

या वक्तव्यावरून ‘पुन्हा ‘हिंदी चिनी भाई भाई’ सांगत चीन भारतावर कुरघोडी करणार’, असेच लक्षात येते !

जैसे ‘लिट्टे’ को समाप्त किया, वैैसे इस्लामिक स्टेट को करो ! – श्रीलंका के राष्ट्रपति मैत्रिपाला सिरीसेना का सेना को आदेश

भारत को ऐसे शासक कब मिलेंगे ?

भारताला असे शासनकर्ते कधी मिळणार ?

‘तमिळी बंडखोरांच्या ‘लिट्टे’ या संघटनेला नष्ट करण्यात आले. या अनुभवाचा वापर करून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना नष्ट करा’, असा आदेश श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी सुरक्षादलांना दिला आहे.

भारत क्षेपणास्त्रांची निर्यात करणार !

भारताने बनवलेल्या क्षेपणास्त्रांंच्या पहिल्या तुकडीची निर्यात करण्यास आम्ही सिद्ध असून यासाठी सरकारची आवश्यक संमती मिळायची आहे. दक्षिण-पूर्व आशिया आणि आखाती भाग येथील देशांनी भारतीय क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात रस दाखवला आहे.

श्रीलंकेकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांची इस्लामिक स्टेटचा प्रमुख आतंकवादी बगदादी याला चेतावणी

लहान देश असणारी श्रीलंका एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ‘दुःख व्यक्त करतो’ किंवा ‘भ्याड आक्रमण’ असे चौकटीतील शब्द वापरण्याऐवजी थेट इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला चेतावणी देते. भारतीय शासनकर्ते यातून काही शिकतील का ?

कॅनडाने पाठवलेला कचरा माघारी न नेल्यास युद्ध करू ! – फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांची चेतावणी

कुठे कचरा माघारी न नेल्यास युद्धाची घोषणा करणारा छोटासा फिलिपिन्स, तर कुठे गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकला एकदाही अशी चेतावणी न देणारा आणि प्रत्यक्षातही निष्क्रीय रहाणारा भारत !

चीनने संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशात दाखवले !

चीनला आशियामध्ये तो राबवत असलेल्या ‘बीआर्आय’ प्रकल्पासाठी भारताचे सहकार्य हवे आहे. त्यामुळेच भारताला खुश करण्यासाठी त्याने हे जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल आहे. चीनच्या अशा खेळीकडे भारतानेही तितक्याच सतर्कतेने पाहिले पाहिजे !

अमेरिकेकडून भारतासह ८ देशांना इराणकडून तेल खरेदीस मनाई

अमेरिकेची दादागिरी ! अमेरिकेला पाकचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखतांना त्याच्यावर निर्बंध का घालता आले नव्हते ? सोयीनुसार स्वतःची दादागिरी करण्यासाठी अमेरिका असे निर्बंध लादतो हे लक्षात घ्या !

भारत श्रीलंकेच्या सैनिकांना प्रशिक्षण देणार

श्रीलंकेच्या सैन्याकडून लिट्टेच्या विरोधातील युद्धाच्या वेळी ३५ सहस्र निरपराध हिंदूंचे हत्याकांड करण्यात आले असतांना त्याला प्रशिक्षण देण्याची गांधीगिरी भाजप सरकार का करत आहे ?

(म्हणे) ‘भारत आणि पाक यांना पुढे जाण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री

भारताने सैनिकी कारवाई करू नये, यासाठी आधी इम्रान खान आणि आता त्यांचे परराष्ट्रमंत्री अशा प्रकारची विधाने करून भारताला कारवाईपासून परावृत्त करत आहेत ! ‘भारताने चर्चा करावी आणि आम्ही सीमेवर आतंकवादी कारवाया अन् गोळीबार करत राहू’, असेच पाकला अपेक्षित आहे !


Multi Language |Offline reading | PDF