अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प, ‘टेरिफ’ (आयात कर) आणि सोने !
एका वर्षातच २४ टक्क्यांनी सोन्याचे भाव वाढले आहेत. सध्याच्या सोन्याच्या भावातील भरारीचा आढावा घेतला असता जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत जागतिक बाजारपेठेमध्ये या मौल्यवान धातूच्या भावामध्ये४२ टक्क्यांची वाढ झालेली आहे. या आश्चर्यजनक दरवाढीमुळे संपूर्ण जगाला बुचकळ्यात टाकले आहे.