‘शॅडो वॉर’ म्हणजे काय ?‘शॅडो वॉर’ म्हणजे गुप्तपणे केलेल्या सशस्त्र संघर्षाचा एक प्रकार. यात अनेकदा शत्रूदेश एकमेकांशी थेट सैनिकी संघर्ष करण्याऐवजी सायबर आक्रमणे, आर्थिक निर्बंध किंवा गुप्त सैनिकी कारवाया यांद्वारे संबंधित देशाला संपवण्याचा प्रयत्न करतात. |

वॉशिंग्टन – अमेरिकास्थित ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ने (सी.एस्.आय.एस्.ने) त्याच्या अहवालात म्हटले आहे की, जगाचा एक मोठा भाग सध्या युद्धात अडकला आहे. ‘सी.एस्.आय.एस्.’ने म्हटले आहे की, रशियाने अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध ‘शॅडो वॉर’ पुकारले आहे. रशिया अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध सायबर आक्रमणे आणि हेरगिरी करत आहे. पाश्चात्त्य देशांकडून युक्रेनला मिळत असलेले साहाय्य कमकुवत करणे हा त्यामागील उद्देश आहे. एका बाजूला थेट युद्ध आहे आणि दुसर्या बाजूला ‘शॅडो वॉर’ चालू आहे, असा दावा ‘सी.एस्.आय.एस्.’च्या अहवालात करण्यात आला आहे.
१. या अहवालानुसार अलीकडच्या काळात युरोपमध्ये सैनिकी तळांवर स्फोट, सरकारी ईमेल हॅक होणे आणि समुद्राखालील केबल्स तुटणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
२. ‘सी.एस्.आय.एस्.’च्या मते, रशियाने आरंभलेले ‘शॅडो वॉर’ ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नाटो’ संघटनेतील २९ देशांचा आणि जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.
३. रशिया ऊर्जा आणि वाहतूक यंत्रणा यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. यामुळे उत्तर अमेरिकेशी जोडलेल्या प्रणाली धोक्यात येऊ शकतात.