पेरू देशाचे स्वागतार्ह पाऊल !

पेरू देशात ४८ वर्षीय व्यक्तीने ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. तेथेही ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी करण्यात आली. यानंतर अल्पावधीतच सरकारने धाडसी पाऊल उचलले.

अनधिकृतांचे पाठीराखे !

अनधिकृत बांधकामे ! अशा ठिकाणांहून देशविरोधी कारवाया चालत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघड झाले आहे. जहांगीरपुरीतील दंगल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे ही समस्या केवळ अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने न हाताळता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळणे, ही काळाची आवश्यकता आहे !

पोलीस आणि इफ्तार पार्टी !

आतापर्यंत काही ठराविक दंगली सोडल्या, तर अन्य वेळी पोलिसांना दंगलखोर धर्मांधांना रोखण्यास पूर्ण अपयश मिळाले आहे. असे स्वाभिमानशून्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत. कायद्याचे राज्य हवे असेल, तर पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत अभूतपूर्व पालट करणे आवश्यक आहे.

उद्दाम धर्मांध !

भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान !

‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे !

घटनाद्रोही आदेश !

‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !

दोन तपांची साधना !

भारत हा आध्यात्मिक स्तरावर विश्‍वगुरु होता. त्याला पुन्हा त्याचा मान मिळवून देण्यात ‘सनातन प्रभात’ खारीचा वाटा उचलत आहे. यामध्ये ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते आणि हितचिंतक यांचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळे या वर्धापनदिनी त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो !

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !