देहली दंगल !

  • देहली येथील दंगलखोरांना अद्दल घडवण्यासाठी मध्यप्रदेशप्रमाणे उपाययोजना करणार का ?
  • हिंदूंना सण आणि उत्सव खऱ्या अर्थाने साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागेल !

१६ एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी देहलीबाहेरील जहांगीरपुरी येथे झालेल्या दंगलीनंतर शोभायात्रेवर गोळ्या चालवणारा सोनू चिकना याच्या पत्नीची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले होते. त्या वेळी पोलिसांवर छतावरून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी ती नियंत्रणात आणली. तिथे अचानक १०० धर्मांध महिला जमल्या. सोनू चिकना याच्या आईने ‘माझ्या मुलाने केवळ धमकी देण्यासाठी बंदूक चालवली; कुणाला काही लागले नाही’, असे सांगितले. बांगलादेशींची मोठ्या प्रमाणात वस्ती असलेला हा देहलीबाहेरील ‘सी ब्लॉक’ परिसर आहे.

येथून जाणाऱ्या शोभायात्रेला अडवून अन्सार याने क्षुल्लक वाद उकरून काढला आणि दंगल चालू केली. ‘यांना सोडायचे नाही, जिवे मारायचे आहे’, अशी वाक्ये शोभायात्रेचे नेतृत्व करत असलेले आणि तलवारीचा वार मानेवर झालेले उमाशंकर दुबे यांनी ऐकले. गळ्यातील माळेमुळे त्यांचा गळा चिरला गेला नाही. त्या वेळी धर्मांध तरुण मुले आणि महिला यांनी मोठ्या प्रमाणात बाटल्या अन् प्रचंड दगड मिरवणुकीवर फेकले. ‘१० ‘राऊंड’ (फैरी) गोळ्या झाडल्या गेल्या’, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ८ पोलीस घायाळ झाले. या दंगलीनंतर प्रथमच पोलिसांनी तत्परतेने २४ जणांना अटक केली. आरोपी अन्सार आणि अस्लम यांच्याकडून ३ बंदुका अन् ५ तलवारी कह्यात घेतल्या. त्यामुळे आता धर्मांधांचे नेते ‘एकतर्फी कारवाई’ केल्याची ओरड करत आहेत. इतकी वर्र्षे ‘आक्रमण एकतर्फी आणि कारवाई दोघांवर’, असे होते. त्यामुळे आता धर्मांध नेत्यांची ही ओरड चालू झाली; त्यानंतर धर्मांधांच्या दबावामुळे शोभायात्रेच्या आयोजनात सहभागी झालेल्या एका कुटुंबातील ५ जणांना पोलिसांनी अटक केली. शोभायात्रेत शस्त्र घेतल्याची आवईही धर्मांधांच्या नेत्यांनी उठवली आहे. एवढेच नव्हे, तर तेथील मशिदीवर भगवा ध्वज लावल्याचे तद्दन खोटेही धर्मांध नेत्यांनी माध्यमांना सांगितले. हिंदूंजवळ शस्त्रे असती, तर दंगलीच्या वेळची स्थिती वेगळी झाली नसती का ?

वर्ष २०२० ची दंगल !

यापूर्वीही फेब्रुवारी २०२० मध्ये ३ दिवस चालू असलेल्या देहली दंगलीत ५३ जण ठार झाले, मोठ्या प्रमाणात आगी लावून प्रचंड वित्तहानी करण्यात आली. ५५ पोलीस आणि ७०० नागरिक घायाळ झालेल्या या दंगलीत पोलिसांनी अपेक्षित भूमिका न घेतल्याने अखेरीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना रस्त्यावर उतरावे लागले. एवढी मोठी दंगल होऊनही त्या वेळी आरोपी झालेला अन्सार हा मोकाट सुटला आणि बाहेर राहून त्याने परत हनुमान जयंतीची दंगल घडवली. तेव्हाच त्याला कठोर शिक्षा तत्परतेने झाली असती, तर कदाचित् आज या दंगलीत तो नसता वा ही दंगल झालीही नसती.

केजरीवालांचे सल्ले हिंदूंनाच !

जहांगीरपुरीतील या दंगलीनंतर देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘‘एकमेकांचा हात पकडून शांती कायम ठेवा !’’ म्हणजे धर्मांधांनी हिंदूंवर बंदुकीच्या गोळ्या आणि तलवारी चालवाव्यात अन् ‘हिंदूंनी मात्र त्यांचा हात पकडून शांती कायम ठेवावी.’ गांधीजींच्या ‘मुसलमानांनी हिंदूंवर कितीही अत्याचार केले, तरी ते हिंदूंनी सहन केले पाहिजेत’, या शिकवणीपेक्षा हा उपदेश यत्किंचितही वेगळा नाही. अशा नेत्याचा एका तरी हिंदूला आधार वाटेल का ? किंबहुना असा नेता कोणत्या हिंदूला हवा आहे, जो त्याचे मरण समोर दिसत असतांना त्यांना शांत रहाण्याचे सल्ले देत आहे. वर्ष २०२० ची देहली दंगल ३ दिवस चालू देण्यास केजरीवाल यांचे देहली पोलीस उत्तरदायी होते. ‘पोलिसांवरही दबाव होता’, अशी उघड चर्चा त्या वेळी मोठ्या प्रमाणात झाली. अर्थात् ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याच्या सूत्राची खिल्ली उडवणाऱ्या केजरीवाल यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दंगलीत प्रथम वाद उकरून काढून दंगल चालू करणारा आरोपी अन्सार याचे आम आदमी पक्षाशी संबंध आहेत, अशीही चर्चा आहे.

पालटते फासे !

हे जरी होत असले, तरीही एक समाधानाची गोष्ट म्हणजे हिंदूंना खडबडून जागे करणारे वैचारिक परिवर्तनाचे वारे सध्या वाहू लागले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर कथित पुरोगाम्यांचा खोटेपणा वेशीवर टांगला गेला. कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांतील हिजाब विरोध, धर्मांध फळविक्रेत्यांचे वर्चस्व मोडणे, मंदिराच्या परिसरात मुसलमान विक्रेत्यांना बंदी आदी सूत्रे उठत असतांनाच महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात केलेल्या आवाहनाने महाराष्ट्रात जणू अन्यायाविरुद्धच्या सात्त्विक संतापाचे वादळ घोंगावू लागले. देशभर त्याचे पडसाद उमटले. प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उघडपणे ‘नास्तिक’ म्हणण्याचे धैर्य राज ठाकरे यांनी दाखवले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही त्यांच्या संदर्भातील जुना इतिहास काढून सत्य उघडपणे मांडण्याचे धैर्य आले. यंदा प्रथमच प्रसारमाध्यमांनी देशभरात झालेल्या दंगलींच्या विविध राज्यांची नावे एकत्रित दाखवली. वर्षानुवर्षे हिंदूंच्या सणाला दंगली होत आहेत आणि त्यांच्या मिरवणुकांवर आक्रमणे होत आहेत; पण त्याचे वृत्त देण्याचे साधे सौजन्यही आतापर्यंत प्रसारमाध्यमांनी दाखवले नव्हते. देहलीतील विकासपुरी भागात झालेल्या हनुमान जयंतीच्या मिरवणुकांत हिंदूंनी प्रथमच तलवारी घेऊन सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे पोलिसांना त्यांना जहांगीरपुरीचा संदर्भ देऊन त्याचे कारण सांगता आले. हिंदूंनी सक्षम, सबळ आणि संघटित होणे, तसेच शौर्यवृत्ती सतत जागृत ठेवणे, हेच धर्मांधांचा उद्दामपणा, कांगावखोरपणा, आक्रमकता आणि हिंसक वृत्ती याला उत्तर आहे, हे या घटनेवरून लक्षात येते, असेच म्हणावे लागेल. मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !