कणाकणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती देणारा आणि सर्वांवर चैतन्याची उधळण करणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साधक, वाचक आणि जिज्ञासू यांच्यावर चैतन्याची उधळण करणाऱ्या या सोहळ्यात सर्वत्र गुरुदेवांचेच अस्तित्व निर्गुण तत्त्वरूपाने पुष्कळ प्रमाणात जाणवले !

जिज्ञासूंच्या मनावर धर्माचरणाचे महत्त्व अंकित करणारा महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा संशोधन कक्ष

वैज्ञानिक परिभाषेत धर्माचरणाची माहिती देणारा हा कक्ष जिज्ञासूंच्या मनावर आचारधर्माचे महत्त्व अंकित करणारा ठरला. या कक्षात जिज्ञासूंना संशोधन करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि प्रयोगांचे निष्कर्ष यांची माहिती देण्यात आली.

वाचक आणि जिज्ञासू यांनी अनुभवलेला ‘सनातन आश्रम’ !

वर्धापनदिनाच्या निमित्ताने आश्रमात आलेल्या जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय व्यक्त केले. आश्रमातील सेवांच्या विविमगध कक्षांत वाचकांना जे जाणवले, ते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘तेजस्वी विचार’ वाचून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे ?’ याविषयी मार्गदर्शन मिळते ! – सौ. सरस्वती शंखवाळकर, (गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची मोठी बहीण)

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे माझे सर्वांत आवडते दैनिक आहे आणि मी प्रतिदिन ते वाचते. दैनिकाच्या पहिल्या पृष्ठावरील गुरुमाऊलींचे ‘तेजस्वी विचार’ हे सदर मी प्रथम वाचते. त्यातून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे’, याविषयी मार्गदर्शन मिळते.

वर्धापनदिनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन आश्रम’ यांच्याविषयी व्यक्त केलेले भावस्पर्शी विचार !

‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ संपूर्ण हिंदुस्थानात हिंदु संस्कृती आणि धर्मसंस्कार देण्याचे कार्य करत आहेत. आज हिंदूंमधील अज्ञान दूर करण्यासाठी शुद्ध ज्ञान देण्याचे महान कार्य हे नियतकालिक करत आहे !’

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा परिपूर्ण, तळमळीने आणि प्रामाणिकपणे करणारे कु. विशाल (वय २० वर्षे) आणि श्री. इंद्रेश बिरादर (वय २५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘श्री. नागेश बिरादर यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना, म्हणजे कु. विशाल (वय २० वर्षे), श्री. इंद्रेश (वय २५ वर्षे) यांना साधना सांगून गुरुसेवेसाठी सिद्ध केले आहे. आता ते दोघे पहाटे ५ वाजता उठून घरापासून ५ कि.मी. अंतरावर दैनिकाचा गठ्ठा आणायला जातात आणि तेथून ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाला प्रारंभ करतात.

सेवेच्या तळमळीमुळेे अनेक वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांंना सनातनच्या कार्याशी जोडून ठेवणारे फोंडा, गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक श्री. नागेश बिरादर !

‘श्री. नागेश बिरादर हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रारंभीपासूनचे वितरक आहेत. समाजात त्यांना ‘नागण्णा’ या नावाने ओळखतात. पूर्वी नागण्णा सायकलवरून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत होते. आता ते स्कूटरवरून वितरण करतात.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना हणजुणे, गोवा येथील श्री. बाबूराव गडेकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

हणजुणे, बार्देश, गोवा येथील श्री. बाबूराव गडेकर हे दुचाकी पायलट (दुचाकी टॅक्सीचालक) आहेत. साधना म्हणून प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ।

अनेकदा विरोधाला धीरोदात्तपणे सामोरे जाते ।
लढवय्ये ते नेहमीच विजयश्री प्राप्त करते ।
शिवरायाचा मावळाच जणू ते भासते ।
म्हणूनच संत, ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळवते ।