राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आश्वासन ! –  मुख्यमंत्री

गोव्यात ३७ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह गोव्यात विविध उपक्रम राबवणे, यांसाठी केंद्र सरकार गोवा सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २२ ऑगस्ट या दिवशी दुपारी गोवा दौर्‍यासाठी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

आय.व्ही.एफ्. उपचारपद्धत विनाशुल्क देणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

प्रत्येक आय.व्ही.एफ्. उपचारपद्धतीसाठी सरकार सरासरी ५ ते ७ लाख रुपये खर्च करणार ! उपकरणांसाठी सरकार खासगी आस्थापनांकडून सी.एस्.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून साहाय्य घेणार आहे.

गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !

बाणस्तारी (गोवा) येथील भीषण अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक साहाय्य

रविवार, ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अपघातामध्ये मर्सिडीज गाडीच्या मद्यधुंद असलेल्या चालकाने धडक दिल्याने दिवाडी येथील सुरेश फडते आणि त्यांची पत्नी भावना फडते अन् बंगालमधील एक २६ वर्षीय युवक अनुप कर्माकर हे मृत झाले होते.

कला अकादमीच्या सभागृहाचा ‘स्लॅब’ लोखंडी सळ्या गंजल्याने कोसळला : आय.आय.टी.चा अहवाल !

राज्याचे मुख्य अभियंता, आय.आय.टी. मुंबई आणि त्यानंतर आय.आय.टी. देहली यांनी दिलेल्या अहवालात ‘हे बांधकाम ४३ वर्षे जुने असल्याने लोखंडी सळ्या गंजल्यामुळे ‘स्लॅब’ कोसळला’, असे कारण दिले आहे.

कळंगुट (गोवा) येथील क्लबमधील युवतीने तिच्याशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या थोबाडीत मारले !

जनतेचे रक्षक कि भक्षक पोलीस ? क्लबमध्ये जाऊन युवतीशी गैरवर्तन करणार्‍या पोलिसांकडून सामान्य युवती आणि महिला यांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?

गोवा : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रहित करण्यासाठी विरोधकांचा सरकारवर दबाव

क्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकरणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम चालू आहे. सरकारने हा प्रकल्प रहित करावा.

चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकत असल्याचे उघड : अपघाताचे गोवा विधानसभेत पडसाद

या भीषण अपघाताच्या प्रकरणी संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे वाहन हाकणे, वैयक्तिक आणि दुसर्‍याची सुरक्षितता धोक्यात आणणे, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.

‘मणीपूर’वर चर्चा फेटाळली : विरोधकांचे ठिय्या आंदोलन !

‘‘मणीपूरचा विषय हा अत्यंत संवेदनशील आहे. हा विषय सर्वाेच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. राज्य आणि केंद्र शासन यांनी या विषयाची नोंद घेतलेली आहे. यामुळे हा ठराव फेटाळण्यात येत आहे.’’ – सभापती रमेश तवडकर, गोवा