DK Shivakumar Deputy CM Karnataka : आपण आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे विधान

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

उडुपी (कर्नाटक) –  देव वरदान किंवा शाप देत नाही, तर संधी उपलब्ध करून देतो. आपण आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे. धर्माचे संरक्षण करणे, टिकवणे आवश्यक आहे; कोणत्याही धर्मात ‘कुणाला त्रास द्या’ असे सांगितलेले नाही. (एका धर्मात ‘अन्य धर्मियांना ठार करा, त्यांच्या बायका आणि संपत्ती कह्यात घ्या, त्यांची मंदिरे तोडा’, असे सांगितले आहे, याविषयी डी.के. शिवकुमार सांगतील का ? – संपादक) जे मंदिराची सेवा करतात त्यांना नेहमीच देवाचे आशीर्वाद लाभतात. भक्तीविना कुणीही जीवन जगू शकत नाही, असे मार्गदर्शन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले. ते उडुपी जिल्ह्यातील कापू शहरात श्री हळेमारिगुडि (मारियम्मा देवीचे जुने मंदिर) मंदिरात ब्रह्मकलशोत्सव कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की,

१. भक्त आणि भगवंत यांच्यातील नाते जेथे दृढ होते ते स्थळ म्हणजेच मंदिर. (असे आहे तर सरकार मंदिर भक्तांना न सोपवता त्याचे सरकारीकरण का करते ? आता तरी मंदिरांना उत्पन्नाचे स्रोत असे न बघता ते भक्तांना सोपवणार का ? – संपादक)

२. कोणताही धर्म असो, त्याचे तत्त्वज्ञान एकच असते. (असे आहे, तर एकाच धर्मात आतंकवादी का निर्माण होतात ? तेथे संत का निर्माण होत नाहीत ? – संपादक)

३. मारियम्मा देवीचा पहिला प्रसाद मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी येथे उपमुख्यमंत्री म्हणून आलो नाही, तर एका भक्ताच्या भूमिकेत आलो आहे. (प्रत्येक भक्त याच भावनेने मंदिरांत येतो; पण मंदिर सरकारीकरणामुळे त्याने भावभक्तीने अर्पण केलेले पैसे मंदिरासाठी न वापरता त्यात भ्रष्टाचार होत आहे. यावर शिवकुमार कारवाई करणार आहेत का ? – संपादक)

४. संपूर्ण राज्यात नागरिकांनी शासनाचे पाठबळ न घेता स्वतःच्या प्रयत्नांनी मंदिरे उभारली आहेत. (भक्त देवावरील श्रद्धापोटी मंदिरे बांधतात, तर सरकार तेथे येणार्‍या पैशांवर डोळा ठेऊन ती लुबाडण्यास प्रयत्नशील असते. त्यासाठी छोटे-मोठे वाद असल्याचे कारणही देत मंदिरे नियंत्रणात घेतली जातात. अशा मंदिरांना न्याय कधी मिळणार ? – संपादक) अशा घटना मी कुठेही पाहिल्या नाहीत. येथे आल्यावर मला पुष्कळ समाधान मिळाले. मी माझ्या पत्नीला आणि कुटुंबीय यांनाही येथे पाठवणार आहे.

५. मी कोणत्याही मंदिराला भेट दिली किंवा धार्मिक विषयावर बोललो, तरी तो चर्चेचा विषय बनतो. एकदा मी एका ठिकाणी येशूच्या मूर्तीला प्रोत्साहन दिले, म्हणून तुमच्याच जिल्ह्यातील लोकांनी मला ‘येशू कुमार’ (येशूचा मुलगा) असे संबोधले. दुसर्‍या वेळी एका खासदाराने मुसलमानांंविषयी अपमानास्पद वक्तव्य केले, तेव्हा मी सांगितले होते की, ‘ते (मुसलमान) देखील आपलेच भाऊ आहेत, त्यांच्याविना आपण जगू शकत नाही. आपण मांस कापू शकतो का ? ते तेच काम करतात. प्रत्येकाने आपापले कार्य करावे.’ (हिंदूंमध्ये खाटिक समाज आहे आणि तो मांस विक्रीचे कार्य करतो. हलाल (हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते.) मासांच्या नावाखाली या हिंदु खाटिकांना वाळीत टाकण्यात आल्याने आता केवळ हिंदूंना मुसलमानांकडचे हलाल मांस खावे लागत आहे, हे शिवकुमार का सांगत नाहीत ? – संपादक)

६. मी त्यांना (मुसलमानांना) ‘ब्रदर्स’ (भाऊ) म्हटले म्हणून मला आणखी एका वेगळ्या नावाने हाक मारण्यात आली. (हिंदूच मुसलमानांना भाऊ म्हणतात; मात्र मुसलमान हिंदूंना ‘काफीर’ (इस्लामला न मानणारा, मूर्तीपूजक) म्हणतात आणि त्यातूनच  हिंदूंना काश्मीरसह अन्य ठिकाणांवरून हाकलून लावले जाते, हे शिवकुमार का सांगत नाहीत ? – संपादक)

७. मी शिवमंदिरात गेलो, तरी लोक मला काहीतरी वेगळ्या प्रकारे हाक मारतात. मी कुंभमेळ्यात सहभागी झालो होतो, तेथे पाण्याला जात, धर्म किंवा राजकीय पक्ष असतो का ? कुंभमेळ्यात सहभागी होणे चुकीचे आहे का ? लोक काहीही बोलतात. (काँग्रेसी जेव्हा मंदिरांमध्ये जातात, तेव्हा ते भाविक म्हणून नाही, तर राजकीय स्वार्थासाठीच जातात, हाच आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. शिवकुमार महाकुंभाला गेले; मात्र ते राममंदिरात गेलेले नाहीत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे दोन्ही ठिकाणी गेलेले नाहीत यावर शिवकुमार बोलावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

डी.के. शिवकुमार हिंदु धर्माचे रक्षण कसे आणि कधीपासून करणार आहेत, हे त्यांनी घोषित करावे. यासाठी ते काय काय करणार आहेत, तेही हिंदूंना सांगावे !