हरमल समुद्रकिनार्‍यावर अमली पदार्थासहित नायजेरियन नागरिक कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाने २४ डिसेंबर या दिवशी रात्री हरमल समुद्रकिनार्‍यावर वालांकिणी चॅपल या ठिकाणी आंतोनिया ओबीना या नायजेरियन नागरिकाला समवेत १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले.

वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अजीज इस्माईल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कह्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती अजीज इस्माईल तथा मंगलदादा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे २५ सहस्र आरोपींना जामीन

शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ७ गुन्हे नोंद करत ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी पाटण (जिल्हा सातारा) येथील राष्ट्रवादी काँग्रसच्या नगरसेवकांना अटक : एक दिवसाची पोलीस कोठडी

प्रेस नावाच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर २५ डिसेंबर या दिवशी अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्यामुळे पाटण (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन कुंभार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

विकलेल्या संत्राच्या बागेचे पैसे मागण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता व्यापार्‍याने त्याला मद्य पाजून मारहाण केली.

‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थाे दासगुप्ता यांना अटक

‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.

नागपूर येथे ५० लाख रुपये हुंड्याच्या मागणीला कंटाळून विवाहित आधुनिक वैद्य महिलेची आत्महत्या

पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करत मंगेश यांना अटक करण्यात आली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणार्‍या शीव (मुंबई) रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांना अटक

डॉ. वर्मा यांना अटक या प्रकरणी अन्य विद्यार्थ्यांचीही फसवणूक झाली आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत.

नगरमधील एका व्यक्तीला ७० लाखांना गंडा घालणारा नायजेरीन नागरिक पोलिसांच्या हाती

भारतात पुष्कळ मोठ्या प्रमाणात नायजेरीयन येऊन अमली पदार्थ विकण्यापासून विविध प्रकारचे गंभीर गुन्हे आणि दादागिरी करतात.

यवतमाळ पोलिसांकडून ५०० पेट्या मद्यसाठा जप्त !

ट्रकने आलेला ५०० पेट्या मद्यसाठा पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यात आला असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमात आहे.