ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेवर बलात्कार

पंतप्रधानांकडून क्षमायाचना करत चौकशी करण्याचे आश्‍वासन

ऑस्ट्रेलिया संसद

कॅनबेरा (ऑस्टेलिया) – एका महिलेने ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. याविषयी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या महिलेची क्षमा मागितली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

पीडित महिलेच्या आरोपानुसार मार्च २०१९ मध्ये संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ‘बलात्कार करणारा आरोपी सरकारी पक्षासाठी काम करतो’, असे महिलेने सांगितले आहे.