मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना मानवाधिकार आयोगाकडून नोटीस

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना नोटीस

मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.

अनधिकृत बंदूक बाळगणार्‍या तिघांना अटक

अनधिकृत बंदूक उपलब्ध करून देणार्‍यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

वसई (जिल्हा पालघर) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकणार्‍या नराधमाला अटक

मुंबई उपनगरातील वसई येथे एका वासनांधाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून ती मृत झाली आहे, असे समजून पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी या नराधमाला अटक केले असून त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.

केरळमधील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणात २८ वर्षांनंतर पाद्री आणि नन दोषी !

चर्च आणि त्याच्याशी निगडित संस्था हे अनाचाराचे अड्डे ! या प्रकरणात गुन्हेगारी वृत्तीच्या पाद्री आणि नन यांना वाचवणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई हवी ! हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारे पुरोगामी आणि निधर्मीवादी आता गप्प का ?

पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

बलुचिस्तानसाठी लढणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. पत्रकार साजिद हुसैन यांचा ही असाच मृत्यू झाला होता !

अफजलखान वधाच्या दिवशी ट्विटरवरील #ShivPratapDin हॅशटॅग ट्रेंड चौथ्या स्थानी !

या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

पुण्यात १ कोटी रुपयांचा चरस जप्त; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीहून रेल्वेतून महाराष्ट्र्रात आणण्यात आलेला अनुमाने १ कोटी रुपये मूल्याचा चरस पुण्यात लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे.

मृत गाय-बैल यांचे मांस आणि कातडी बाळगणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

शफिकउल्ला खान यांनी ‘मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात काय चुकीचे आहे ?’, याविषयी न्यायालयात याचिका केली होती.

जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याने सातारा येथील भाजप सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हा नोंद

सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !