अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण जनतेचा लोकशाहीवरील उरलासुरळा विश्वासही नष्ट करणारे आहे ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रासाठी हे शोभनीय नाही. अशी गलितगात्र झालेली लोकशाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यता स्पष्ट करते !

मुंबई – भाजपच्या नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. भाजप नेत्यांची महिलांविषयीची डझनभर प्रकरणे मला सांगता येतील, असे वक्तव्य भूकंप आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केले. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत आहे. या संदर्भात विजय वड्डेटीवार यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी विजय वड्डेटीवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. संजय राठोड हे ‘मिडिया ट्रायल’चे बळी ठरले आहेत.’’
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर