Giorgia Meloni : रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्‍यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात !

संघर्षाच्‍या निराकरणात चीन आणि भारत यांची भूमिका असली पाहिजे, असे माझे म्‍हणणे आहे. तसेच युक्रेनला एकटे टाकून हा संघर्ष सोडवला जाऊ शकतो, असा विचार करणेच शक्‍य नाही.

Saudi China Stopped Pakistani Investment : आर्थिक दिवाळखोर पाकिस्‍तानमधील गुंतवणूक सौदी अरेबिया आणि चीन यांनी रोखली !

चीन आणि सौदी अरेबिया यांनी पाकिस्‍तानमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचे मान्‍य केले होते; मात्र पाकिस्‍तानचे आर्थिक दिवाळे वाजल्‍यामुळे त्‍यांनी गुंतवणूक रोखून धरली आहे.

Bangladesh ‘Jamaat-e-Islami’ : (म्हणे) ‘बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’, हा एक सुसंघटित राजकीय पक्ष !’ – चीन

चीन डावपेचात हुशार ! भारताला शह देण्यासाठी बांगलादेशाशी जवळीक साधणार्‍या चीनचा धूर्तपणा ओळखा !

चीनने प्रथम त्याच्या १० लाख चौरस कि.मी.वर रशियाने मिळवलेले नियंत्रण हटवावे ! – तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह

तैवानने आता चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीवर उपरोधिक टीका केली आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी म्हटले आहे की, जर चीनचा तैवानवरील दावा प्रादेशिक अखंडतेशी संबंधित असेल, तर चीन सरकारने रशियाकडून १० लाख चौरस कि.मी. भूमी परत घ्यावी.

Chinese Yaks : लडाखच्या सीमेवर चीनच्या ४० याक प्राण्यांची घुसखोरी !

कालपर्यंत चीनचे सैनिक घुसखोरी करत होते आणि आता ते प्राण्यांना घुसखोरी करण्यासाठी पाठवत आहेत. भारत अशा प्रकारच्या डावपेचात कधी हुशार होणार ?

Muhammad Yunus : चीनमधील सौर पॅनेलचे कारखाने बांगलादेशात स्‍थलांतरित करा ! – महंमद युनूस

बांगलादेश आता चीनचा बटिक होणार, हेच यातून स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे भविष्‍यात चीन बांगलादेशाच्‍या खांद्यावर बंदुक ठेवून भारताच्‍या विरोधात कारवाया करणार, हेही स्‍पष्‍ट आहे. बांगलादेशात हस्‍तक्षेप न केल्‍याचे फळ भारताला पुढे भोगावेच लागणार आहे !

Baloch Liberation Army : मरायचे नसेल, तर बलुचिस्तान सोडून निघून जा ! – बलुच लिबरेशन आर्मी

बालुचिस्तानची भूमी केवळ बलुच लोकांची आहे. पाक आणि चीन येथील लोक या भूमीवर राहिले, तर त्यांची हानी होईल. चीन आणि पाकिस्तान यांच्या लोकांना मरायचे नसेल, तर त्यांनी बलुचिस्तान सोडून निघून जावे, अशी धमकी ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या मजीद ब्रिगेडने पाक अन् चीन यांना एका व्हिडिओद्वारे दिली.

US Imposes 400 Entities : अमेरिकेने रशिया आणि चीन यांच्‍या ४०० हून अधिक व्‍यक्‍ती आणि संस्‍था यांवर घातले निर्बंध!

रशिया आणि चीन यांच्‍यासह अमेरिकेने बेलारूस, इटली, तुर्कीये, ऑस्‍ट्रिया, लिक्‍टेंस्‍टाईन आणि स्‍वित्‍झर्लंड या देशांच्‍या नागरिकांवरही निर्बंध लादले आहेत.

China QR Code Robbery : चीनमध्ये बौद्ध मंदिरांच्या दानपेटीवर स्वत:चा ‘क्यू.आर्.कोड’ लावून चोराने लाटले लाखो रुपये !

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या बातमीनुसार बाओजी शहरातील बौद्ध फामेन मंदिरातील सी.सी.टी.व्ही.च्या चित्रीकरणात चोर ‘क्यू.आर्.कोड’ लावत असल्याचे दिसून आले.

येत्या काळात प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेचा हस्तक्षेप वाढलेला दिसेल !

‘बांगलादेश उठावामागे अमेरिकेचा हात आहे’, असा उघड आरोप तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘सेंट मार्टिन बेट’ अमेरिकेला न दिल्याने हा उठाव केला’, असे त्यांचे म्हणणे आहे..