बीजिंग (चीन) –चीनमधील हुनान प्रांतात ८२८ कोटी डॉलर्सचा (७ लाख कोटी रुपयांचा) मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. ‘हुनान अकादमी ऑफ जिओलॉजी’ने पिंगजियांग काउंटीमध्ये हे सोने सापडल्याचे सांगत तेथे ३००.२ टन सोने असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भूमीच्या २ सहस्र मीटरपेक्षा अधिक खोलीवर हे साठे आहेत. चीन हा जगातील सर्वांत मोठा सोने उत्पादक देश आहे. वर्ष २०२३ मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान १० टक्के होते.