चिनी लोकांच्या वटवाघुळ खाण्याच्या सवयीमुळेच कोरोनाचा प्रसार !
१२ वर्षांपूर्वीच वैज्ञानिकांनी दिली होती चेतावणी
आसुरी सवयीमुळे आज जग विनाशाच्या खाईत लोटले जात आहे, हे आतातरी स्वतःला अधिक प्रगत समजणार्यांच्या लक्षात येईल का ?
१२ वर्षांपूर्वीच वैज्ञानिकांनी दिली होती चेतावणी
आसुरी सवयीमुळे आज जग विनाशाच्या खाईत लोटले जात आहे, हे आतातरी स्वतःला अधिक प्रगत समजणार्यांच्या लक्षात येईल का ?
चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.
चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ती बसमधून कामावरून शाडोंग प्रांतामधून परत येत असतांना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे
चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !
कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसणार आहे. वाहन उद्योगासाठी लागणारे ३० ते ४० टक्के सुटे भाग चीनहून आयात होतात; मात्र चीनमध्ये उत्पादनावर मर्यादा आल्याने, तसेच आयात थांबल्याने वाहन उद्योगावर संकट निर्माण होणार आहे.