तमिळनाडूत भाजपच्या १३ नेत्यांचा अण्णाद्रमुक पक्षात प्रवेश !

अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी

चेन्नई – तमिळनाडूतील भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेच्या १३ नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र देत अण्णाद्रमुक पक्षात प्रवेश केला. याविरोधात भाजपच्या नेत्यांनी आंदोलन करत अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी यांच्यावर युतीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

अण्णाद्रमुकने मात्र भाजपचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ५ मार्चला भाजपच्या अन्य ५ नेत्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले होते. त्यात भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख निर्मल कुमार यांचाही समावेश होता. निर्मल कुमार यांनी, ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांचे सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या नेत्याशी साटेलोटे आहे’, असा आरोप केला होता.